मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ती.. आणि तीच… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ती.. आणि तीच… ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

संसाराचा गाडा ओढतांना,

ती खांद्याला खांदा लावते |

प्रत्येक नर नारायणाला,

त्याची लक्ष्मी अशीच पावते |

*

नांदा रांधा उष्टी खरकटी काढा,

इतक्यावर ती थांबत नाही कधी |

वेळ प्रसंगी कंबरेला पदर खोचून,

घराच्या प्रगतीची सोडत नाही संधी |

*
तिच्याच भक्कम पायांवर,

संसाराचा डोलारा उभा राहतो |

कशाची उणीव आहे की नाही,

तिच्या डोळ्यातच तो सारं पहातो |

*
संसारातल्या अडीअडचणीला,

तीच त्याला हिम्मत देत राहते |

तोल कधी ढळणार नाही त्याचा,

कटाक्षाने सार काही सांभाळते |

*
ती शिकलेली असो वा अडाणी,

संसाराचं गणित अचूक सोडवते |

लेकरांना नुसता जन्मच देत नाही,

चांगल्या संस्कारांनी त्यांना घडवते |

*

व्यक्ती म्हणून जरी एक असली तरी,

जीवनात अनेक भूमिका ती निभावते |

संसार सहाणेवर चंदनाप्रमाणे झिजून,

आयुष्यभर शीतल सुगंधाने दरवळते |

☆

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अगतिकता… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अगतिकता…  ?  सुश्री नीलांबरी शिर्के ☆

☆

सवारीच्या डोई सावली

याच्या डोई तळपे ऊन

रस्त्यावर रिक्षा चालवे

लेकराला उरी धरून

*
एका हाती निरागसता

 दुजा हात कर्तव्य लढे

 पायांनी रेटत ही रिक्षा

 एकटा पिलासह झगडे

*
काय असेल अगतिकता

असेल कोठे पोराची माय!

आजारी असेल घरामधे

की वाईट घडले असेल काय?

*
चित्र पाहता येई व्याकुळता

डोळा भरूनी येई पाणी

रिक्षा चालवणाऱ्या बापाची त्या 

अन् काय असेल कहाणी?

☆

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तिच्यासम तीच… – चित्रे दोन.. काव्ये दोन.. आशय मात्र एकच ☆ कवयित्री : सुश्री रेखा हिरेमठ आणि कवि: अज्ञात – प्रस्तुती: सुश्री शोभा जोशी  ☆ ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? तिच्यासम तीच … ?

☆ चित्रे दोन.. काव्ये दोन.. आशय मात्र एकच ☆ कवयित्री : सुश्री रेखा हिरेमठ आणि कवि: अज्ञात – प्रस्तुती: सुश्री शोभा जोशी  ☆

☆ ☆ ☆ ☆

सुश्री रेखा हिरेमठ

( १ )

कशाला पाहिजे वंशाला दिवा

ही तेजस्वी समई एकवार पहा 

*

मंद जळते साऱ्या कुटुंबासाठी

तरीही नाही दुषणे जिच्या ओठी

*

साक्षात सूर्याला घेऊन माथ्यावर

हास्य विलसे जिच्या चेहऱ्यावर

*

 पैसे कमवून नवऱ्याच्या जोडीने

घरी येऊन पुन्हा घरकाम करे गोडीने

*

आई आजी बहिण मुलगी बायको

कोणतेही नात्याने जोडलेली असो

*

 बनते प्रेरणा ही कायम चरा चराची

 तेवणारी ज्योत ही शोभा घरा घराची

*
उगीच म्हणत नाहीत तिला शक्ती

तिच्या सम कोणाला जमते भक्ती

☆

कवयित्री : सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

☆ ☆ ☆ ☆

सुश्री शोभा जोशी 

(२) 

रोज रोज एकटा चालून,

सूर्य होता दमला,

बघून ही टोपली,

त्यात जाऊन बसला,

माताच ती,

समजला तिला त्याचा कंटाळा,

निघाली ती घराला।

Son in Hand n Sun in Basket.

☆ ☆ ☆ ☆

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जगणे हलाखीचे, मरण सुखाचे!! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जगणे हलाखीचे, मरण सुखाचे!! ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

वीतभर खळगीने नाचवले,

अर्धपोटी देह त्यानं पोसला।

निपचित पडला एकटाच,

जगाला आज तो दिसला।

*

आयुष्यभर लक्तरं मिरवली,

आज नवा पांढरा कपडा।

उचलाया लोक दारी आले,

सुखावला गरीबाचा झोपडा।

*

स्वतः स्वतःचा भार ओढला,

आज मिळाले खांदेकरी चार।

निरोपाला जमलीत मंडळी,

निष्प्राण देहाचा उचलाया भार।

*

येड्यागत रित्या खिशाने राहिला,

नाही समजली जगाची जत्रा।

रंक म्हणून जगला आयुष्यभर,

राजावानी खांद्यावर ही अंत्ययात्रा।

*

चुलीत घालाया कधी नव्हती लाकडं,

आज त्याच्यासाठी रचले जगाने सरण।

हसत हसत स्वतःशी पुटपुटला,

हालाखीचे ते जगणे, सुखाचे हे मरण।

☆

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पण ओंजळ रितीच… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पण ओंजळ रितीच…  ?  सुश्री नीलांबरी शिर्के ☆

☆

कवठी चाफ्याचा

गंधच भारी

तबकात सजुन

मोबाईलच्या दारी

*

दर्शनमात्रे मन

प्रसन्न होते

गंध हुंगण्या मन

व्याकूळ होते

*

भेटीचे सुख

पाहता मुख

रित्या ओंजळीचे

सलतेच दु:ख….

☆

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कर काही स्वानंदासाठी… ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कर काही स्वानंदासाठी... ? सौ शालिनी जोशी ☆

☆

अशी का सखे तू उदास 

 एकटीच पायरीवर बैसलीस

*

 घर दिसे शोभिवंत टूमदार 

 बाजूला झाडे वेलीही सुंदर 

*

 समोर हा झुला निवांत 

 चहू बाजूला सारा शुकशुकाट

*

 मुले बाळे नातेवाईक दूर 

 म्हणून का दिसे ही हुरहुर 

*

अगं कर्तव्य आपले करावे

 परी अपेक्षात गुंतू नये ग

*

 जग सारे आपलेच जाणतेस

 पुरव आता तुझा छंद हौस 

*

इतके दिवस गेले दुसऱ्यासाठी

आता कर काही स्वानंदासाठी

*

उठ सखे आता सत्वर ….

 घे झोका गा गाणे सुंदर ….

☆

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – दमदार साथ… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? दमदार साथ… ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

दमदार अशीच साथ लागते,

सहजीवन सोबत काढतांना |

थकत नाही तिची पाऊलं,

संसाराचा गाडा ओढतांना |

संसाराच्या तव्यावर,

पहिले चटके, मग भाकर |

कष्ट उपासल्याशिवाय,

जीवन नसते ते सुकर |

देह जरी वाकला,

तरी सोसत असते कळ |

गात्र जरी थकली,

तरी तीच देत राहते बळ |

काडी काडी जमवत,

पक्षीण घरटे बांधते |

सूत ज्याच्याशी जुळले,

त्याच्या संगे सुखे नांदते |

ऊन वारा पाऊस सोसत,

संसाराची घडी बसवते |

लाज कशाची न बाळगता,

त्याच्या संगे कष्ट उपसते |

जन्माजन्माची गाठ बांधत,

भाळी कुंकू अभिमानाने मिरविते |

साधीभोळी जरी असली तरी,

संसाराचा गाडा त्याच्या संगे खेचते|

☆

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ शिकवण… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? शिकवण ?  सुश्री नीलांबरी शिर्के ☆

☆

शेंडा तोडा.. फांद्या कापा

जोवर शाबूत असती मुळं

सृष्टीच्या वरदाने फुटत जाणे..

हातचा मळ..

*
मुळाकडूनच मिळता बळ

तुटणं कोलमडणं होतच नाही

मूळ जपावं आपणाच साठी

निसर्ग नित्यच शिकवत राही

*

शिकणं न शिकणं ज्याच्या त्याच्या हाती असतं 

वृध्दाश्रमाचं पेव उगाच फुटत नसतं 

☆

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्रतारणा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ प्रतारणा… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

होता तिन्हीसांज सखये 

मन माझे भरून येई 

झाकोळल्या नभा सवे 

जीव माझा व्याकुळ होई

*
आठवणीत तव प्रिये 

बसलो किनारी निवांत

ही भरती सागराची 

काहूर उठवी मनांत 

*

वचन दिले तू मजला 

आज भेटू सायंकाळी 

वाट पहात बसलो इथे 

मज नकोशा कातरवेळी

*
रवी गेला अस्ताचला 

तरी कुठे ना तव चाहूल 

तुझ्या खोट्या वचनाची 

कशी पडली मला भूल 

*
माझ्या खऱ्या प्रेमाची 

करू नको प्रतारणा 

खेळ तुझा हा प्रेमाचा 

मज वाटे जीवघेणा

मज वाटे जीवघेणा

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आज कुठे मी हरवली आहे… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – आज कुठे मी हरवली आहे… – ?  सुश्री संगीता कुलकर्णी ☆

☆

वास्तवात असूनही

मन स्वप्नं गुंफित आहे

न जाणे वेड्या मनासवे

आज कुठे मी हरवली आहे…

*

शब्दांचा अर्थ शोधतांना

शब्दच आज विरत आहे

बेलगाम मनाला आवरता

न जाणे आज कुठे मी

हरवली आहे…

*

मेघ बरसत असताना

मन चिंब भिजले असताना

न जाणे आज कुठे मी

हरवली आहे 

☆

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares