ई- अभिव्यक्तीवर सातत्याने कविता लिहिणार्या नीलम माणगावे यांच्या ‘किती सावारावा तोल’ या कथासंग्रहाला, ‘कुंडल कृष्णाई पुरस्कार जाहीर झाला आहे. ई-अभिव्यक्ती तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन.
ई–अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
दि.15/08/20 पासून आम्ही ई-अभिव्यक्ती मराठी आवृत्ती नवीन स्वरूपात प्रकाशित करीत आहोत. यामध्ये साहित्याच्या विविध प्रकारांचा समावेश करून अंक वैविध्यपूर्ण बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
एक वाचक म्हणून आपल्याला अंकाचे स्वरूप कसे वाटते हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. तरी आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अपेक्षा मोजक्या शब्दात आम्हाला कळवाव्यात, ही विनंती.
प्रतिक्रिया विशिष्ट लेख, कविता किंवा एकंदर अंकाबद्दल असाव्यात.आपले नाव व फोन नंबर चा उल्लेखही करावा, ही विनंती.
मला उज्ज्वला केळकर यांनी ई-अभिव्यक्तीच्या लिंक शेअर केल्या. त्यातील साहित्य मी वाचते. अनेक नवीन लेखक/लेखिकांचे साहित्य वाचायला मिळाले.
सध्या आमची लायब्ररी बंद असल्यामुळे पुस्तके वाचायला मिळत नाहीत. ई-अभिव्यक्ती वर वेगवेगळे साहित्य प्रकार वाचायला मिळाले. त्यासाठी संपादक मंडळ ई-अभिव्यक्ती यांचे मनःपूर्वक आभार !
मला ज्योती जोशी यांचा माझी दुपार हा लेख आणि मंजुषा मुले यांची आशीर्वाद ही अनुवादित लघुकथा आवडली.
गत वर्ष हमने महात्मा गांधी जी के 150वें जन्मोत्सव के अवसर पर अग्रज वरिष्ठ साहित्यकार श्री जय प्रकाश पाण्डेय जी के अतिथि सम्पादन में दो भागों में गांधी जयंती विशेषांक का प्रकाशन किया था, जिसे आप सभी का भरपूर प्रतिसाद मिला।
पाठकों के विशेष अनुरोध पर हम उन दोनों विशेषांक में प्रकाशित रचनाओं के शॉर्ट लिंक्स प्रस्तुत कर रहे हैं। आप उन शॉर्ट लिंक्स पर क्लिक कर रचनाएँ पढ़ सकते हैं।
– हेमन्त बावनकर, ब्लॉग संपादक ई-अभिव्यक्ति
☆ 150वींगांधीजयंतीविशेष – 1 ☆
हिन्दी साहित्य – ई-अभिव्यक्ति संवाद – ☆ 150वीं गांधी जयंती विशेष-1 ☆ अतिथि संपादक की कलम से ……. महात्मा गांधी प्रसंग ☆ – श्री जय प्रकाश पाण्डेय
काही दिवसांपूर्वी उज्वला मावशींनी (ज्येष्ठ लेखिका उज्वला केळकर) यांनी मला इ – अभिव्यक्ती च्या काही लिंक शेअर केल्या. शिवाय मलाही त्यासाठी काहीतरी लिहायला सांगितले. त्यामुळे त्या निमित्ताने मी ते साहित्य वाचायला सुरुवात केली.
वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळे लेखक- लेखिका खरोखरच अतिशय उत्तम व्यक्त झाले आहेत. यातील काहीजण पूर्वीपासूनच या क्षेत्रातील दिग्गज आहेत , तर काही नवोदित आहेत. पण तरीही सर्वांचे लेखन हे वाचताना खूपच मजा येते. आपण अनेक अनुभवांनी समृद्ध झाल्यासारखे वाटते. संपादक मंडळ चोखंदळ असल्यामुळे बऱ्याच उत्तम कलाकृती सहज वाचनासाठी उपलब्ध होत आहेत. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार!
डॉ. मेधा फणसळकर
अभिप्राय – 2
अंकाचे स्वरूप परिपूर्ण वाटते.बहुतेक सर्व साहित्यप्रकारांचा समावेश त्यात आहे. (शब्दमर्यादेमुळे नाटक/एकांकिका वगळता ).मुख्य म्हणजे निसर्गाजवळ नेणारे लेख वाचून मन प्रसन्न होतं. लेखकाचे फोटो व माहिती जोडल्यामुळे त्यांची व्यक्तिगत ओळख झाल्यासारखं वाटतं. थोडक्यात, अंक खूप आवडला.
आजच्या परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा वापर करून वाचक आणि लेखक या दोघांनाही आपण एक नवे दालन उपलब्ध करुन दिलंत! वाचन व लेखन यासाठी आपण हाती घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे . तोही मराठी भाषेसाठी असल्यामुळे अभिमानास्पद आहे. छोट्या छोट्या लेखांच्या,गोष्टींच्या तसेच कवितेंच्या रुपातून ई- अभिव्यक्ती मार्फत हे साहित्य सहजपणे अनेकांच्या हातात पोचत आहे. जाता येता; कमी वेळात; कोठेही; सहजपणे वाचता येते. लॉकडाऊनमुळे वाचनालये बंद पडली आहेत. ई-अभिव्यक्ती वाचकांची तहान भागवण्याचे मोठं काम पार पाडत आहे. नवनवीन साहित्यकृती वाचायला मिळत आहेत. एक लेखिका म्हणून मला नवं आधुनिक व्यासपीठ मिळालं आहेच. पण एक वाचक म्हणून मिळणारा आनंद सुद्धा मोठा आहे.
अतिशय नेटकेपणाने, काही ओळीतून मांडलेली अभिव्यक्ती ‘थोडक्यात समजणे। थोडक्यात समजावणे। मुद्देसुद बोलणे। ही संवाद कला या संत तुकारामांच्या ओवीची आठवण करुन देते.
धन्यवाद ,
सौ. दीपा पुजारी, इचलकरंजी
अभिप्राय – 2
मी लिहीत असलेले माझे विचार ह्या माध्यमा मुळे लोकांपर्यंत पोचत आहेत, ह्याचा मला आनंद वाटतो. आमच्या सारख्या नवोदित लिहिणार्या साठी ही खूप मोठी संधी आहे जी आम्हाला केळकर काकू आणि पंडित सरांनी उपलब्ध करून दिली आहे.
या माध्यमातून मला ही अनेकांचे विचार कळण्यास मदत होते. मला सौ उज्ज्वला केळकर यांच्या मुळे ही संधी मिळाली.
आपण सुरु केलेले ई-अभिव्यक्तिचे अंक मी नियमित वाचते.अंकातील साहित्य प्रकारांचे,लेखकांनी केलेले लेखन विषयानुसरून आणि लालित्यपूर्ण वाटते.सर्व साहित्य प्रकारांचा समावेश असल्याने कंटाळा येत नाही.या अंकाच्या परिपूर्ण वाटचालीसाठी शुभेच्छा!
श्रीमती अनुराधा फाटक
अभिप्राय – 2
ही साईट खूप आवडली. साहित्य निर्मिती आणि साहित्याचा रसास्वाद या दोन्ही गोष्टींना उद्युक्त करणारा हा एक वेगळाच मंच, अतिशय नेटका आणि सुघटित वाटतो. यावर प्रकाशित होणाऱ्या साहित्यातले वैविध्य, त्याचे तितकेच वैविध्यपूर्ण सादरीकरण, आणि एकूणच साहित्याचा आणि या मंचाचा दर्जा खरोखरच भावणारा आहे. ह्या उपयुक्त कार्याबद्दल धन्यवाद. ????