सुश्री सुलू साबणे जोशी
इंद्रधनुष्य
☆ ‘प्रोफेसर माधवी लता…’ – लेखक : श्री वेदकुमार ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
या प्रोफेसर माधवी लता आहेत. या सध्या भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू येथे प्राध्यापक आहेत आणि Centre for Sustainable Technologies च्या अध्यक्षपदावर आहेत.
त्यांची शैक्षणिक वाटचाल :
Ph. D – IIT मद्रास
- Tech – NIT वारंगल
- E – JNTU काकीनाडा
त्यांचे संशोधन क्षेत्र आहे :
- भूकंप भू-अभियांत्रिकी (Earthquake Geotechnical Engineering)
- जिओसिंथेटिक्स आणि रॉक इंजिनीअरिंग
प्रोफेसर माधवी लता यांचे ७०+ संशोधन पेपर्स जगभरातील नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. २०१६ ते २०२२ या काळात त्या Indian Geotechnical Journal च्या संपादक पण राहिल्या आहेत. २०२२ मध्ये भारताच्या Top ७५ Women यादीत त्यांचा समावेश झाला होता तर २०२४ मध्ये Indian National Academy of Engineering मध्ये ‘फेलो’ म्हणून त्यांची निवड झाली होती.
चिनाब नदीवरील रेल्वे पूल तयार करण्यामागे जिथे अनेक इंजिनीअर्सची टीम होती, तिथे माधवी लता यांच्या भूमिकेचा एक खास ठसा आहे. पुलाचा पाया, रचना आणि सुरक्षा याची अत्यंत जटिल जबाबदारी त्यांच्यावर होती. भूस्खलन, भूकंप-प्रवण भाग, उंच खोऱ्यांमधील हवेचा वेग, अशा सगळ्या अडचणींवर त्यांनी विज्ञान, चिकाटी आणि जिद्द याच्या जोरावर मात केली.
तब्बल १७ वर्षे या प्रकल्पावर सातत्याने काम करून, त्यांनी भारतीय रेल्वे आणि संपूर्ण देशाला गर्वाचा क्षण मिळवून दिला. प्रोफेसर माधवी लता यांच्या कार्याला मी सॅल्युट करतो!
जय हिंद!
लेखक : श्री वेद कुमार.
प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







