सुश्री प्रभा हर्षे
इंद्रधनुष्य
☆ ”लेफ्टनंट जनरल सुरेंद्र नाथ शर्मा” – इंग्लिश माहिती संग्राहक : अज्ञात अनुवादक ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆
लेफ्टनंट जनरल सुरेंद्र नाथ शर्मा
आज एका अत्यंत कणखर व्यक्तिमत्त्वाबद्दल आपण जाणून घेऊयात.
हे आहेत लेफ्टनंट जनरल सुरेंद्र नाथ शर्मा (S N Sharma). ते १०२ वर्षांचे आहेत. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९२३ रोजी झाला. त्यांच्या पत्नी ९७ वर्षांच्या आहेत त्यांचे सर्व कुटुंबीय ही भारतीय सेनेशी पराक्रमाने जोडले गेलेले आहे.
चला, थोडी झलक पाहूया….
त्यांचे वडील मेजर जनरल अमरनाथ शर्मा हे भारतीय सेनेमध्ये डॉक्टर होते व त्यांनी डायरेक्टर जनरल ऑफ आर्मी मेडिकल कॉर्पस् हे पद भूषविले होते.
त्यांचे मोठे बंधू मेजर सोमनाथ शर्मा यांना अतुलनीय शौर्याबद्दल पहिले परमवीर चक्र मिळाले आहे..
त्यांचे धाकटे बंधू लेफ्टनंट जनरल विश्वनाथ शर्मा हे ही भारतीय सेनेत १९८८ ते १९९०या काळात चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते।
लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ शर्मा यांच्या पत्नीच्या मातोश्री यांनी आपल्या सेनेच्या परमवीर चक्राचे डिझाईन तयार केले आहे.
स्वतः लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ शर्मा भारतीय सेनेत पॅराट्रूपर होते. पॅरॅशूट मधून उडी घेणे ही गोष्ट ते अत्यंत बिनचूकपणे, आवडीने व सर्वस्व पणाला लावून करत असत. आपल्या आयुष्यातील अशी शेवटची उडी त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी मारली आहे.
लेफ्टनंटसाहेब अजूनही स्वतः मोटर ड्रायव्हिंग करतात. हिमाचल प्रदेश येथे असलेल्या त्यांच्या फार्म हाऊसवर पोचण्यासाठी ते स्वतः च १० तास ड्रायव्हिंग करतात.
तुम्ही काय खाता या पत्रकाराच्या प्रश्नाला त्यांनी मोठे मार्मिक उत्तर दिले आहे – –
“ काळजी आणि ताण हे सोडून मी सर्व काही खातो ! अगदी पोटभर ! “
– – आपण सर्वांनी, विशेषत: ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्यापासून स्फूर्ती घेतली पाहिजे आणि आपण सर्वांनी ह्या थोर गृहस्थांचा आदर्श ठेवला पाहिजे.
इंग्लिश माहिती संग्राहक : अज्ञात
मराठी अनुवाद : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







अगदी बरोबर! असे लेख आपल्याला विचार करायला लावतात