सुश्री शीला पतकी
कवितेचा उत्सव
☆ “चल उठ…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
कधी स्वतःवर कधी दैवावर
कधी येणाऱ्या परिस्थितीवर
डोळ्यामध्ये आले आसू
आठवणींच्या त्या कढांवर
*
प्रत्येकाच्या आठवणीवर
डोळे ओले कडाकडांवर
डोळ्यावर त्या चढून काच
सत्य दडवले आत उगाच
*
समज होता वाटलं सारं
हलकेच विसरून गेलय पण
आज पुन्हा आठवणीने
मन कस आलय भरून
*
कशासाठी जगतोय आपण
कोणासाठी जीव?
पुन्हा पुन्हा या प्रश्नावर
स्वतःचीच कीव
*
दुसऱ्यासाठी का रडावे
क्यों सहे हम गम
प्रत्येकाची दुखरी नस
अन असते बोचरी जखम
*
प्रत्येकाच्या उरी असतोच
दुःखाचा एक कढ
तरीही धीर द्यायचा असतो
चल उठ आणि पुनः लढ….!
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



