श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ थेंबे थेंबे… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
इवलासा थेंब
इवलेसे त्यात पाणी
संततधार होता
जन्मे सरिता…
तैसेचि जाणावे
छोटे छोटे सुविचार
जीवनात घडवी
परिवर्तन आमूलाग्र…
साधनरूपी थेंब
नीत, सातत्याने
आचरीता, करीता
मिळे मोक्षरुपी सागरास..
विषयातून निवृत्त होवोनी
ज्ञानार्जन करोनी
सोपान चढोनी
मुक्ती मिळवावी…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈




