सुश्री प्राची जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ विठुरायाचे नामामृत… ☆ सुश्री प्राची जोशी ☆

जन्मोजन्मी व्हावे वाटे

तुझिया चरणांचा दास

तुझ्याच दर्शनाची ओढ

हीच एक मनी आस

*

उभी ठाकलेली मूर्ती

रूप तिचे अती सुंदर

कर ठेऊनीया कटेवरी

पाय ठाकले विटेवरी

*

वाट पाही हा भक्तांची

असा हा सावळा सुंदर

भक्त असे धावती प्रेमात

आषाढवारीच्या मेळ्यात

*

वाटे असे भक्ताना

वारी घडावी निरंतर

दर्शन व्हावे डोळ्यांना

सुंदर आणि मनोहर

*

वारीची ओढ विलक्षण

भक्त अन देवालाही

भेटणे हे आसुसलेले

माया ही जीवाशिवाची

*

गळाभेट ही विठुरायाशी

द्वैत दोघांमधील संपवी

विठुरायाच्या अंतरीही

विट हलते प्रेमभावाची

*

मनामनात वाजे गजर

विठुरायाचा नामघोष

भक्त असे डोलत राहती

विठूरायाच्या नाममृतात….

विठूरायाच्या नाममृतात….

©  सुश्री प्राची अभय जोशी

मो 9822065666 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments