डॉ. सोनिया कस्तुरे
कवितेचा उत्सव
🍃 तोल 🍃 डॉ.सोनिया कस्तुरे ☆
☆
हुंदका मनाचा मांडता यावा
खोल उसासा जाणता यावा
*
कुठूनतरी येतात सुखध्वनी
अचूक तो ओळखता यावा
*
कुणी आपुले नसतेच येथे
दोन घडीचा तोल सावरता यावा
*
किती राहिले क्षण आता येथले
अबोल निसर्ग न्याहाळता यावा
*
कोण कुठले येतात अनेक सारे
प्रेम, जिव्हाळा पाझरता यावा
*
अनेक कोरडे असतील उन्हाळे
एक थेंब पावसाचा झेलता यावा
☆
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




