श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ मानसी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
(लग्न उद्यावर आलय. नवरदेवाच्या मनातील गूज, या शब्दांनी व्यक्त करतोय.)
☆
मनी मानसी
तूच असशी
मनमोर विभोर
आयुष्यात तूझे येणे..
नवे नवे क्षितीज
अबोध ती चाहूल
सुख स्वप्न ही नवे
आयुष्यात तूझे येणे…
आली समीप घटी
उरली कही पळे
अंतरपाटही सरेल
हसमुख तूझे रूपचांदणे…
ओलांडून माप
येशील तू गृहलक्ष्मी बनून,
रिमझीम सौख्यात
न्हाईल हे घराणे…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈





