सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ वारकरी श्रेष्ठ… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
☆
आहे वारकरी| सुखी समाधानी |
भक्ति भाव मनी | विठूराया |
ओळख वारीची| मायभूमी एक|
जाती ह्या अनेक| भेद मोठे|
कळले ज्ञान्याला| एकीच्या मिषाने|
घडविले त्याने| वारकरी|
तुका म्हणे तेणे|एकीची ही वारी|
जाऊया पंढरी| एकादशी|
भंगलेली मने| व्हावीत अभंग|
होऊ या नि:संग| वारीसाठी|
वारीला जातांना| काय दिसे चित्र|
वारकरी मित्र| भाव मोठा|
येथे कोणी नाही| ज्येष्ठ नि कनिष्ठ|
वारकरी श्रेष्ठ| वंदनीय|
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





