म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? कवितेचा उत्सव ?

पावसाचे एक खाते ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

 कुठे पाऊस रूसला, कुठे पाऊस हसला

 गोळा बेरीज करता, औंदा कमीच दिसला

*

 थोडा शेतात थांबला, थोडा रस्त्यात तुंबला

 ज्याची त्याची सुखदुःखे, कोणी म्हणतो लांबला

*

 ह्याची उसाची पेरणी, त्याची भाताची लावणी

 ज्याला नाहीच वावर, बाग फुलवी अंगणी

*

 साज लेई यौवनाचा, खरा दोस्त तरूणांचा

 पान पान भिजलेले, सखा भिजल्या स्वप्नांचा

*

 पावसाचे एक खाते, घरा घरामध्ये आहे

 त्याच्या येण्याची चाहूल, तिच्या नियोजनी आहे

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments