सुश्री शीला पतकी
कवितेचा उत्सव
☆ “का असे?” ☆ सुश्री शीला पतकी ☆
☆
अरे असे आज काय बरे झाले?
काळीज सारे उसवून आले
काळजात कोंबलेल सारे फिरून आले
ते दुःख त्या आठवणीडोळे भरून आले//
*
मज्जाव त्या क्षणाना केला कितीदा तरी
मागे वळून त्याना नाहीच मी पाहिले
ते लडिवाळ बंडखोर पुढती ऊभे सदैव
झिडकारले तयाना बिलगून तेही गेले//
*
दुःखद आठवणी त्या तरी सुखास स्पर्श होतो
गोंजारून पुनः त्या अन गुंतून त्यात राहतो
का काळजा असा तू ऊसवून पुनः येतो?
ते बोलले बिचारे,, …..!
दुःख तुझे जपताना मीही गुंतून बसतो
मित्रा कधीतरी रे मी ही फाटून जातो//
☆
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




