सौ शालिनी जोशी
कवितेचा उत्सव
☆ संत नामदेव… ☆ सौ शालिनी जोशी ☆
☆
पांडुरंग नवसाला पावला
दामाशेठगोणाई घरी नामदेव जन्मला
विठ्ठलाचा ध्यास बालपणापासून
बालहट्ट पुरविला देवाने करून नैवद्यप्राशन
गळा वीणा हाती टाळ मुखी हरिकीर्तन
वाळवंटी दुमदुमे हरिनाम संकीर्तन
परी मी श्रेष्ठ भक्त वाढे अहंकार
संतमेळ्याने गुरु दाखविला विठोबा खेचर
गुरु चमत्काराने दिसे सर्वत्र शिव
सारे विश्व शिवमय दिव्य अनुभव
भागवतधर्माची ध्वजा नेली पंजाबात
किंकर होऊन विस्तारीली इमारत भागवत
इहलोकीची यात्रा संपविली पंढरपुरी
होऊन राहिला विठ्ठलमंदिराची पायरी
संतशिरोमणी म्हणती ज्ञानेश्वर
त्या भक्ता नामदेवा नम्र नमस्कार🙏🙏🙏
☆
© सौ. शालिनी जोशी
संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.
मोबाईल नं.—9850909383
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




