श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ ऋतू आणि वय… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
कळ्या उमलू लागल्या
मुले अभ्यासात रमू लागली
पटांगणे खेळू लागले
सांजवेळ रंगू लागली
आईच्या प्रेमभर, ताईच्या संगत
गप्पा गोष्टी नव्या-नव्या
फुलू लागल्या
पेरणीने माती सुखावून गेली
मृगाच्या पावसात भिजताना
गाव, वाटा, ओहोळ, नाले
गाऊ लागले
शाळेचे दिवस आठवू लागले
डोळेही ओहोळासारखेच संथ
वाहू लागले
ऋतूसारखे असेच बालपण
फिर-फिरुन यावे
आशेनेच प्रगल्भ वय
बागडू लागले
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




