सौ. वंदना अशोक हुळबत्ते
कवितेचा उत्सव
☆ श्रावण… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
☆
उन्ह पाऊसचा
खेळ श्रावणात
*
इंद्रधनुची कमान
उमटते आभाळात
*
धरणी नटते
हिरव्या शालूत
*
बोचरा वारा
खळबळ हृदयात
*
मन होते पाखरू
नाचते तालात
*
गाणं येता ओठी
श्रावण हसतो गालात
☆
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६ ४१६
मो.९६५७४९०८९२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



