सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवन☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

दुज्या कुणाच्या ओंजळीतुनी तहान भागत नाही

मरणा आधी स्वर्ग कुणाला कधीच दिसत नाही

*

सुरकुतलेल्या चेहेऱ्याचा तू चिंतातुर दिसतो

हसले नाही तर जगण्याला येणे रंगत नाही

*

लाटांवरती स्वार होउनी कवेत घे तू वादळ

अनुभवाविना संसाराची खोली समजत नाही

*

पारखून घे आसपासचे सखे सोबती सगळे

मधुमेहाला गोड बोलणे सुद्धा चालत नाही

*

प्रसाद खाण्या पाखंडी पण कुणी मंदिरी येती

किर्तनाविना भक्तांची तर पंगत रंगत नाही

*

पुस्तकातले ज्ञान पाजळू नकोस येथे काही

जीवनातले ठेच लागणे ‘वाचून’ कळत नाही

*

दंतविहिन पण असा कसा हो हिरवा हिरवा आहे

वय झाले पण जगण्याची तो आशा सोडत नाही

 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Vasant M Kale

सुंदर! कमी आणि चपखल शब्दात खूप काही व्यक्त केलय!!

सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

धन्यवाद 🙏🙏