श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ सारे इथले नश्वर… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
दिस विसर कालचा,
नाही भरोसा उद्याचा.
क्षण आताचा जगूया,
फक्त आजचा आत्ताचा.
गेली कोमेजून फुले,
झाली निर्माल्य निकामी.
येता झुळुक वार्याची,
होते ओंजळ रिकामी.
नको जपूस अत्तर,
घेई ताजातवाना सुगंध.
नको कोणतेच पाश,
जग स्वच्छंदी बेधुंद.
विसरुन दुःख अश्रू,
शोध हास्यात ईश्वर.
नाही कांहीच अंतिम,
सारे इथले नश्वर.
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




