श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ तख्त मराठी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
शिवरायांच्या दरबारातील
कणखर बाणा वाण मराठी
अभिमानाने जपत जायचा
आपण आपला प्राण मराठी
*
सह्याद्रीच्या कडे कपारी
तेवत असतो पोत मराठी
मंदिरातल्या देव पुजेला
कायम जळते ज्योत मराठी
*
पर्वतरांगा मधल्या सगळ्या
गडकोटांवर भव्य मराठी
निशानात ही भगव्या आहे
सळसळणारी दिव्य मराठी
*
जात मराठी पात मराठी
आमचे ही गणगोत मराठी
आभाळातील विजा चमकती
देत घोषणा आज मराठी
*
मराठमोळ्या आवेशाने
झटतो आहे आज मराठी
जपण्यासाठी भविष्यातले
वैभव आपले खास मराठी
*
आम्ही मावळे शिवरायांचे
मायबोलीचे भक्त मराठी
सज्ज आजही सावरण्याला
तख्त मराठी रक्त मराठी
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



