श्री विनायक कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ मी न बोललो तुला… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆
(गझलपंचमी)
☆
मी न बोललो तुला, ऐकलेस तू कसे
शब्द जे हवे तसे, वेचलेस तू कसे
*
आज लाजली जुई, पाहुनी पुन्हा मला
कालचेच गंध ते, माळलेस तू कसे
*
पापण्यात रोखतो, आसवे तशीच ती
दुःख या मनातले, ढाळलेस तू कसे
*
पाहतो तुला जरी, लांब राहुनी उभा
प्रेम अंतरातले, मोजलेस तू कसे
*
काल भेटलो जिथे, थांबतो तिथेच ये
सांगण्याअधी मला, शोधलेस तू कसे
☆
© श्री विनायक कुलकर्णी
मो – 8600081092
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




सुंदर कविता