श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🦚👧🏻 हु र हू र! 👧🏻 🦚 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

(“वेध माहेराचे” या आधीच्या कवितेत म्हटल्या प्रमाणे, नव्या नवरीला श्रावणात माहेरी जाण्याचे वेध तर लागतात, पण एकदा माहेरी आल्यावर नवऱ्याची आठवण पण छळायला लागते! तेंव्हा तिच्या मनांतले विचार कसे असतील ते सांगायचा प्रयत्न खालील कवितेत केला आहे! 🙏)

☆

नाही उतरली अंगाची

ओली हळद अजून,

आले धावत माहेरी

पहिल्या सणवारी सजून!

*

भेटता माहेरवाशिणी

मज मनी झाला हर्ष,

तरी अंग थरारे आठवून

पहिला ‘त्यांचा’ स्पर्श!

*

सख्या साऱ्या करती

माझीच थट्टा मस्करी,

मी मग हासून वरवर

विरह झाकतसे उरी!

*

आता संपताच श्रावण

जाईन धावत सासराला,

जाण्या मिठीत रायाच्या

जीव माझा आसुसला!

जीव माझा आसुसला!

☆

© श्री प्रमोद वामन वर्तक

०२-०८-२०२५

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted