श्री दयानंद घोटकर

? कवितेचा उत्सव ?

☆ निळे स्वप्न ☆ श्री दयानंद घोटकर

निळे स्वप्न

कृष्ण होतो आम्ही 

होते बासरी लेखणी

राधेची शायरी

निळ्या रंगात देखणी…

तना मनात कृष्ण

हृदयातही कृष्ण

शब्द निळा निळा

त्यात अवतरे श्रीकृष्ण

सात सुरांचे थरावर थर

हंडी सुरांची आज्ञाचक्रात 

आलाप तान ध्यान

संपन्न तारसप्तकात…

सुरतालांच्या प्रेमाची

रासलीला गोकुळात

निळे नादब्रह्म संचारते

साऱ्या देहादेहात …

स्वरांचे इंद्रधनु

स्वप्निल नयनी

राधेची पुकार

त्या सावळ्या गगनी…

एका राधेची

अधूरी कहाणी

युगे युगे ओठावर

राधा कृष्णाची गाणी….

एक श्वास भक्तीचा

एक ध्यास प्रेमाचा

रंगलेले आवर्तन

निळा खेळ अद्वैताचा…

© श्री दयानंद घोटकर (प्रेमकवी)

संपर्क – तावरे काॅलनी.सातारा रोड.पुणे

मो 9822207068

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments