श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रावण प्रणय… ☆ श्रीशैल चौगुले ☆

असे रंग उधळीत यावी सजणी

रंगून जावा इंद्रधूनत श्रावण.

*

हृदयाचे संवाद शब्दात सांडित

प्रीयाचे मन चिंब भिजवीत भावन.

*

धरतीची हिरवी माया शृंगारुन

मिलनाचे संकेत व्हावेत कवन.

*

पाखरांच्या घरट्यातली कुजबुज

प्रीयेला कळावी माझी प्रीत सृजन.

*

ऋतूने जरासे अंतरीस स्पर्शावे

प्रणयक्रिडा सृष्टीची रती-मदन.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments