सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ मैत्री सुश्री नीलांबरी शिर्के 

मैत्री म्हणजे आयुष्यातील

घमघमणारे असते चंदन

सगळ्या नात्याच्या पल्याड

नसते त्याला कसले बंधन

*

चिमणीचा घासाचा खाऊ

कापडातुनी तुकडा मिळतो

अमृतासम गोडी तयाची

बालपणी मैत्रीतुन कळतो

*

संसाराच्या व्यापामधूनी

मैत्र रेशमी धागा असते

सुखदु:खाच्या प्रवाहाची

विश्वासाची जागा असते

*

मैत्रीमध्ये कळतच नाही

या कानाची त्या काना भाषा

कानामधल्या संवादाला

काळजातच सरळ रेषा

*

हातामध्ये मैत्रहात गुंफता

मनामनाशी जडते नाते

मौनातुनही मी आहे ना!

नीत्यच आपणा मैत्र सांगते

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments