सौ. गौरी गाडेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ समरूप… ☆ सौ. गौरी गाडेकर

पाऊस म्हणजे पंचमहाभूतांचा खेळ

पृथ्वीवरील जलतत्त्व

अग्नितत्त्वाने तापून

वायुरूपाने आकाशात

नंतर आप होऊन पुन्हा खाली

असा हा युगानुयुगे चाललेला

पंचमहाभूतांचा खेळ

 

पाऊस आणि मी

हो. फक्त पाऊस आणि मी

सहस्रार चक्रातून

माझ्या शरीरात प्रवेश करून

मूलाधार चक्रापर्यंतचा

त्याचा प्रवास

क्षणार्धात

 

माझ्या शरीरातील

अणू-रेणू

पेशी-न-पेशी

विरघळून गेल्या

पावसात.

आणि माझं वेगळं अस्तित्व

उरलंच नाही

 

सर्जक, शामक

आणि क्वचित विनाशक

असणाऱ्या पावसाशी

मी समरूप होऊन गेले

मी पाऊसच होऊन गेले

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments