डाॅ. विष्णू वासमकर

? कवितेचा उत्सव ? 

☆ केशवाच्या सुता पुसा तुम्ही ☆ डाॅ. विष्णू वासमकर☆ 

कवितेचा तीर | विस्तारेल कोण

ऐसा नही जाण | भूमीवरी

भूमीवरी साऱ्या | कवी फार झाले

दुरापास्त झाले | रसिक ते

रसिकांनी साऱ्या | कवीला छळावे

कवीला तळावे | तेलामध्ये

तेलामध्ये कवी | तडफडतील

बडबडतील | काही बाही

काहीबाही काही | कविता करिती

करून दाविती | लोकांमध्ये

लोकांना वाटले | कवी हे माजले

माजले कसले | पुंड झाले

अशा ह्या कवींना | काय समजावे

समजुनी घ्यावे | कवितेला

कविता नव्हे ही | एक पोरखेळ

जमुनीया तोल | यावा लागे

यावे लागे बोल | निखळ अस्सल

प्रतिभेचे बोल | असती हे

अस्सल प्रतिभा | आणि व्युत्पत्ती

अभ्यासे निष्पत्ती | काव्यकला

आकाशीची वीज | असते कविता

केशवाच्या सुता | पुसा तुम्ही

© डाॅ. विष्णू वासमकर

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments