श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ उद्या… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
☆
काय ‘उद्या’ च्या मनात..?
काही वेगळे भयाण..?
‘आहे तेच’ की त्याहून
काही स्वप्नवत छान.?
*
गूढ काळोखाची रात्र..?
दैवी पहाट प्रसन्न..?
ताजी तळहाती फुले..?
की हे काळीज विछिन्न..?
*
रिमझिमता श्रावण..?
दारी ऊन सोनसळी..?
की तो वैशाख वणवा..?
ऋतू भकास..वादळी.?
*
काय असेल ‘उद्या’चे
बंद माझ्यासाठी दार.?
मग हवा कश्यासाठी
व्यर्थ आज त्याचा भार…?
☆
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवी / गझलकार
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





