श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ आनंद… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
आम्ही आनंदी पाखरे
मन आभाळ भरारी
आम्हा आनंद सावरे
दुःख-वेदना निवारी.
*
आनंदी गातच गीत
आम्ही आनंदे विहारु
आनंदी स्वप्ने अंतरी
आत्म संतुष्टी साकारु.
*
युध्द वादळ संघर्ष
पार सागर अनंत
आनंदी भाव लहरी
शब्द आनंदे सुपंथ.
*
आम्ही सेवतो आनंद
आनंद आमुचा स्पंद
जीवना सुखाचा स्वर्ग
संसारी आनंद छंद.
*
पसरे आनंद किर्ती
त्रैलोकी सोहळा पुर्ती
देहाचे विकार होमा
देतसे आनंद स्फुर्ती.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





