श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

☆ पदर… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

माझ्या आईचा पदर रान गवतांचा तुरा

जसा वा-यांने उडतो गंध मकरंद चुरा

 *

मोर नाचतो पानात पंखी पिसारा फुलतो

मऊ पदर झुल्यात वारा हसत झुलतो

 *

रोज आईच्या गाण्यात पीक आनंदी डोलते

फुल सुगंध पेरत फुल वा-याशी बोलते

 *

टच् भरलं कणीस चोच पाखरु मागते

आई कणीस देताच प्रेम ह्दयी जागते

 *

काळ्या मातीचं ढेकूळ गंध सुगंध माखते

पान पानात साखर आई स्पर्शाने चाखते

 *

पान वाजवीते टाळी भुंगा अंभग आळवी

आई आल्याची चाहुल रान पक्षांना कळवी

 *

एक उनाड वासरु खुल्या रानात नाचते

आई जाताच समोर प्रेम वात्सल्य वाचते

 *

आई रानात असता झुंड पाखराची फिरे

ताल तो किलकिलाट वाटे वेदमंत्र कि रे

 *

अशी आईची महिमा रोज रानातच हसे

माय फातीमा सोबत ज्योती सावित्री वसे

© श्री मुबारक उमराणी

राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments