श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०९
☆ ही गुलामी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
आधी मुघल आले
त्यांनी आम्हाला
गुलाम केलं
काहींनी
त्यांचा धर्म स्वीकारला
नंतर
इंग्रज आले
त्यांनीही आम्हाला
गुलाम केलं
काहींनी
त्यांचा धर्म स्वीकारला
तरीही आपण
मुळचे
भारतीय आहोत
आज तुम्ही
स्वतंत्र भारतात
जन्माला आलात
इतलंच खाल्लंत
इथेच उच्च शिक्षण घेतलंत
आणि
परदेशात चाललात
त्यांची
गुलामी करायला
दोन पैसे जास्त मिळतात
म्हणून आम्ही
लाचार होतो
ही गुलामी
ही लाचारी
आमच्या रक्तातून
कधी जाणार
हेच कळत नाही
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




