डॉ. माधुरी जोशी

? कवितेचा उत्सव ?

खेळ क्षणांचा… डॉ. माधुरी जोशी 

पूर्व दिशेला दाट धुक्याची

चादर घट्ट पसरली

आषाढातील गर्द घनाची

 अंधुक अजून सावली

पहाट झाली हवा गारशी

नवीन ऋतुची चाहूल

धूसर पडदा फाडून आला

केशरी तेजोगोल

असा केशरी रंग आगळा

गोल देखणे बिंब

अद्भुतसा हा चित्रकार कुणी

त्याने निर्मिले रंग

काही क्षणांचा खेळ मंदसा

झरझर प्रकाश उजळे

सुखद कोवळे बिंब मिटले

केशर मग गडदले

सुंदर मोहक रंग अचानक

लखलखला तेजाने

आकाश आणि सृष्टी सारी

त्या तेजात नाहले

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments