सुश्री दीप्ती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ महत्व पदराचे… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆
(काव्यप्रकार : अष्टाक्षरी)
☆
तुझी सावली पदरा जपे अवस्थी अर्भक
थरी मायेचा पदर सदा बनतो रक्षक ||१||
*
कधी पदर रुमाल ठरे हात पुसण्याला
माझा ठरतो आधार नित्य मम मदतीला ||२||
*
पदराची बाब खास थोपवितो तो उन्हाला
माझ्या डोक्यावर येतो सावली ती धरण्याला ||३||
*
पदराच्या सावलीत सांगे हितगुज मन
असे अमाप विश्वास मुक्त होई मन तन ||४||
*
असो कसाही पदर सुती असो वा रेशमी
एक भाव जपे सदा साथ देतो तो नेहमी ||५||
*
पदराच्या सावलीत नसे कशाचीच भ्रांत
माया पाझरे अंतरी मन करतसे शांत ||६||
*
ममतेचा हा पदर छत्र होई सदा शिरी
होई सदा आश्वासक छाया धरी सर्वांवरी ||७||
☆
© सुश्री दीप्ती कोदंड कुलकर्णी
हैदराबाद
भ्र.९५५२४४८४६१
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





