श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ कर्म… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
आपुलकीच्या
नात्याने
स्नेह जपावा
मनामध्ये
अन् चुकू नये कधी
कर्तव्यामध्ये…
नकोत केवळ
विटांच्या भिंती
स्वार्थ विरहीत
प्रेम असावे चित्ती…
येणा-याचे अगत्याने
स्वागत करु या
जाणा-याच्या मनात
ओढ वाटावी परतण्याची तया…
आज आहोत
उद्या नसू हयात
ओठी प्रत्येकाच्या
नामोल्लेख असावा तयात…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




