कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २८८ – विजय साहित्य
☆ नवे उखाणे…! ☆
(पंधराक्षरी..!)
☆
दिवसाकाठी, जमेल तैसे, भांडून घ्यावे
वेळ काढूनी, हिशोब सारे,
मांडून घ्यावे. १
कधी वायदे, कधी कायदे, प्रेमभराने
कुरापतीचे, अक्षर काळे,
मांडून घ्यावे.२
काय बोलला, कसे वागला,
नका आठवू
गजरा साडी, स्वप्न बोलके,
मांडून घ्यावे.३
नको कुणाचे, फुका टोमणे, सांजसकाळी
ताट भोजनी, तिच्या हातचे
मांडून घ्यावे. ४
प्रेम पाहण्या, हवा कशाला
तुला आरसा
चार कोनते,दिठि मिठीशी,
मांडून घ्यावे. ५
फिरावयाला, नको बहाणे,
जावे सोबत,
घर खर्चाचे, जुने आकडे,
मांडून घ्यावे. ६
तिला पाहिजे,तशीच द्यावी, तिला पैठणी,
मोर नाचरे, सुख दुःखाचे,
मांडून घ्यावे.७
सेमच आहे, प्रेम तरीही,
वागू हटके
ताळेबंद हे, शिलकीतले,
मांडून घ्यावे.८
हवा दुरावा, प्रेमांतरीचा,
रजे मजेचा
ओठांवरती,नवे उखाणे,
मांडून घ्यावे.९
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





