श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ आनंद… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
सदगुरु सेवेसाठी
काया ही झिजवावी,
सदगुरुंची महती आळवावी,
बोल टोचणीचे सोसून…
तपोवनी येती
रंक आणि राव
नाही भेदभाव
होती सारे एकरूप…
जशी टाळ चिपळी
हाती हात घेऊन
धरी ताल, समरस होऊन
साकारे अंतरी नादब्रह्म…
लागे ब्रह्मानंदी टाळी
तुटे जगाचा संग
आत्मरंगी दंग
साधकगण…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





