श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ जगणे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
असले कसले छळते जगणे
फसवा फसवी करते जगणे
*
नखरे करते तितके चुकते
चुकल्या वरती रडते जगणे
*
करुया म्हणते समता ममता
करते समयी फसते जगणे
*
धमकी मिळता बनते हळवे
हरलो म्हणते पळते जगणे
*
ठरल्या वरती बनते पणती
दूस-या करता जळते जगणे
*
जगता जगता हसते म्हणते
सजण्या करता नसते जगणे
*
घटको घटकी झिजते विरते
दमते शिणते मरते जगणे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






