श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ विलीन… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
त्यजूनी अहं
जाता देवाकडे
देवही आतूर
तया भेटण्या गडे..
*
वाटेवर भेटे
सर्वेश जेव्हा
गळाभेट होई
शाश्वत आनंद तेव्हा…
*
कृपासिंधु तो
शाश्वत सुखाच्या
लाटावरती लाटा
पुसून टाकी खुणा दु:खाच्या…
*
क्षणभंगुर जीवनी
क्षण एक त्याच्या मिलनाचा
विरघळून गेलो
मी न राहीलो माझा…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




