सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
कवितेचा उत्सव
☆ मानस-वारी… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
☆
सकाळी उठता नाम तुझे घ्यावे,
नमनासाठी दोन्ही हात जुळावे !
स्नान करताना, चंद्रभागे आठवावे,
नामस्मरणात तुझ्या, चिंब चिंब व्हावे!
*
प्रपंच रेटता, सुख-दुःख विसरावे,
तुझ्या दर्शनाने, भोग सारेच सरावे!
विठ्ठल – विठ्ठल सदा, मुखाने वदावे,
तुझे रूप माझ्या चित्ती,सदैव असावे!
*
तुझ्या चरणावरी, ठेवूनिया डोई,
आनंदाचा पूर डोळां, भेटता विठाई !
जन्म-मरणाची तूच, चुकवावी फेरी,
एकरूप होवो देह, तुझियाच ठायी!
☆
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




