श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ माणसांनी कष्ट घ्यावे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

माणसानी माणसावर लाख केले वार त्यांचे

मीच मोठा मानण्याचे खूप झाले येथे त्यांचे

नाव आहे गाव आहे मानवी अंदाज आहे

आत्मप्रौढी मिरवण्याचे ढोंग आहे फार त्यांचे

 *

टोळक्यांचा मेळ होता कार्य सिद्ध होत जाते

मदतकरण्या खास जमती पाळलेले मोर त्यांचे

 *

नेककेली साधना तर लाभही होणार आहे

संस्कृतीच्या आडदडले भाग्य आहे थोर त्यांचे

 *

वावड्या लढवून काही व्हायचा उपयोग नाही

माणसांनी कष्ट घ्यावे संपवाया घोर त्यांचे

 *

एकट्याने होत नाही काम मोठे जोखमीचे

पाठराखी मिळविण्याला बोलवावे यार त्यांचे

 *

माणसांनी व्हायचे नसते कधीही नामधारी

ध्येय अंती गाठण्याचे हेच आहे दार त्यांचे

 *

योजणे आहे खुबीने योजनांची रूप रेषा

सिद्ध व्हावे माणसानी उचलण्याला भार त्यांचे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted