श्री अनिल वामोरकर
कवितेचा उत्सव
☆ पानगळ… ☆ श्री अनिल वामोरकर ☆
☆
गळू गळू दे
शंकेची, भ्रमाची
कुविचारांची वाळकी पाने,
गळू दे, गळू दे…
वृथा अहंची,
व्यष्टीची आणि
ईर्षेची पाने
गळू दे गळू दे…
लक्ष योनी नंतर
कर्मानुसार
प्राप्त हा देह वृक्ष
याला सत विचारांची,
नवी पालवी फुटू दे..
सद्गुरू कृपे
फुटतील नवी
ज्ञान पालवी
होईल वटवृक्ष
साऊली देई साऊली देई…
☆
© श्री अनिल वामोरकर
अमरावती
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





