श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ मुक्काम दो घडीचा ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

 

मुक्काम दो घडीचा, यात्रा परी निरंत

तो दूर दूर अजुनी, पांथा तुझा दिगंत

 *

पक्ष्यास ज्ञात माझ्या, घरटेच दैव त्याचे

पंखांस रोज चळवी, आकाश ते अनंत

 *

आभाळ फाटताही, ज्याचा ढळे न तारा

परदु:ख दुःख ज्याचे, तो एक भाग्यवंत

 *

तिमिरास तिमिर घेतो, कवटाळुनी उराशी

होतो जराजरासा, काळोख तेजवंत..

 *

रानात दाटलेली, हिमरात्र आरपार

सूर्योदयात एका, फुलतो कधी वसंत

 *

लावण्य जीवनाचे, घे भोगुनी मनस्वी

व्हावा तुझ्या व्यथांचा, शृंगार शोभिवंत

 *

अंतागणीक माझ्या, मी जन्मतो नव्याने

आरंभ हा नवा अन् आता नवीन अंत

  (आनंदकंद)

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted