ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ गणेश स्तवन☆ ज्योती कुळकर्णी ☆  

(वृत्त:पादाकुलक)

नमन करोनी तुला गणेशा

पहिली पूजा तुझी करावी

विघ्ने हरतो बाप्पा म्हणुनी

परंपरा ही सदा जपावी ||||

चमकत असती दोन हिरे या

नेत्री तुजला छान शोभले

नाभी मधली प्रभा हिऱ्याची

तुला पाहुनी भक्त हरखले ||||

 *

चौसष्ट कला ज्ञाता पण्डित

नृत्य नि गायन कला तज्ञही

बुद्धीची ही तुझी प्रभावळ

प्रभा पडू दे भक्तांवरही ||||

 *

काव्य नाटके तुझी पैंजणे

रूणझुण करती आशय सुंदर

वेद पुराणे रत्न अलंकृत

शब्द कोंदणे तत्त्व निरंतर ||||

 *

तव लघु नयनी अवघे हे जग

सांगावे मज कसे मावले

विनायका तू दर्शन दिधले

मस्तक चरणी तुझ्या ठेवले ||||

©  ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted