श्रीशैल चौगुले
कवितेचा उत्सव
☆ पंखझेप… ☆ श्रीशैल चौगुले ☆
☆
फडफडणारे पंख जेंव्हा
गगनाकडे झेप घेतील
संघर्षातील अंधाराला
ते नक्षत्रातील दिप होतील.
घरटे झुलेल पाती-पाती
जुळवून जेंव्हा करता जमा
पाखरांना लाभता संसार
किलबिलाटास न राही तमा.
☆
© श्रीशैल चौगुले
मो. ९६७३०१२०९०.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




