श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३४४ ?

☆ नाटकी मुद्रा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

☆

वर्षाराणी आठवते अन् भिजतो आपण

चकवा देते तिच्याचसाठी झुरतो आपण

*

कर्ज काढुनी इतक्या वस्तू कशास घेतो

दिखावटा अन् किती पसारा करतो आपण

*

किती नाटकी मुद्रा असते पहा आपली

रडता रडता किती नाटकी हसतो आपण

*

चकचकीत हा रस्ता आहे घसरू शकतो

जाणिवपूर्वक त्या रस्त्यावर वळतो आपण

*

कोंबडीस या भिती वाटते आषाढाची

रोज रोज का घरात यांच्या शिजतो आपण

*

देवाने या लालबुंद हे ओठ दिले पण

अजून थोडा रंग लावुनी सजतो आपण

*

मोहाचे या जीवन जाते थांबत नाही

जीवनचक्रामधेच कायम फिरतो आपण

☆

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted