श्री अमोल अनंत केळकर

? कवितेच्या उत्सव ?

☆ वृक्षवल्ली आम्हा… ☆ श्री अमोल अनंत केळकर☆

(सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्याने सध्या जी ‘झाडाझडती’ सुरु आहे त्यावर)

(अर्थात तुकोबांची माफी मागून 🙏)

🌳🌴

वृक्ष वल्ली नसे सोयरी

तपोवनी

वस्ती ही सोईने घालविती!

*

येणे ‘ गुरु’ सिंहे, मेळाव्याचा वास

तोडा झाडी खोड, वाटे येता!

*

आकाश मंडप पृथवी आसन!

जमे तिथे घाव, गोदा- तिरी!

*

तोडलेली मोजून, परवडी विस्तार

सरकारी प्रकार, नसे रुची!

*

तुका म्हणे होय, जनाशी संवाद

नास्तिकाचा वाद आस्तिकांशी!!

*

🌳🌴 

#माझी_फुसकुंडी 📝

© श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments