सौ. जयश्री पाटील
कवितेच्या उत्सव
☆ शेकोटी… ☆ सौ. जयश्री पाटील ☆
☆
थंडी वाढली वाढली
चला शेकोटी पेटवू
हुडहुडी भरलीय
तिला पळवून लावू ll १ ll
*
गोळा करू काटेकुटे
पाला पाचोळा वाळला
कडाक्याची थंडी पळे
पेटविता शेकोटीला ll २ ll
*
शेकोटीच्या भोवताली
बसू मित्रांच्या सोबत
उबदार करू तन
मन मोकळे बोलत ll ३ ll
*
कधी शेतात रानात
येते मैफिल सजून
गप्पा गोष्टी गाणी आणि
होते पौष्टिक भोजन ll ४ ll
*
अशी शेकोटी स्नेहाची
सुख दुःख वाटणारी
सगे सोयरे मित्रांना
एकत्रित आणणारी ll ५ ll
☆
© सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





