श्री अमोल अनंत केळकर

? कवितेच्या उत्सव ?

☆ आवाज हा, आवाज हा… ☆ श्री अमोल अनंत केळकर☆

(अवधूत गुप्ते यांनी विद्यानंद बापट याच्यावर एक गाणे चित्रित केले आहे. त्यापासून स्फूर्ती घेऊन म्हणलं आपण पण एक ढोल बडवावा 😬)

 (गाण्याची चाल: आभास हा, छळतो मला.  चित्रपट : यंदा कर्तव्य आहे)

कधी दूरदूर कधी हे समोर, कान ठणकतो आज का

का हे कसे, होते असे, हा प्रश्न पडे जीवा

कसा सावरू मी आवरू सणाला

होई कंप का हा झोपताना ही मला

आवाज हा, आवाज हा

छळतो तुला छळतो मला 🎷

क्षणात आले स्पीकर सारे, भिंतीच बनूनी जाती

कधी मर्यादा तुटून गेली, काहीच उरे ना हाती

मी असाच उठतो उगाच पाहतो वेळ पुन्हा आठवते

मग मिटून डोळे, कुशी बदलून नको नको से होते

तू वाजताना, झोपण्याचा खेळ हा

दिसे स्वप्न का हे जागताना ही मला

आवाज हा, आवाज हा

छळतो तुला छळतो मला 🥁

 

मनात माझ्या हजार शंका (विद्या) आनंद शोधू कसा रे

तो इथेच आहे, तिथेच नाही आहे खरा कसा रे

नवे ध्वनी सारे,

नको वाटे ही हवा

ले -जहर झाले

 ऐकताना वृंद नवा

 

आवाज हा, आवाज हा

छळतो तुला छळतो मला 🎺 

#माझी_फुसकुंडी 📝

© श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted