डॉ. सोनिया कस्तुरे
चित्रकाव्य
– “अंतर्मनीची प्रेरणा…” –
☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
☆
पाषाण भेदूनी उगवता
आनंद गगनी न मावले
अंतर्मनीची नित्य प्रेरणा
जगण्याचे फूल झाले..!
*
वेदनेचे अनेक स्तर
सुखाने झेलत जाता
किरणाने सोबत केली
आभाळाचे गाणे गाता
*
निळ्याशार उंच गगनी
हिरवी सुंदरता झेपावी
पाहुनी कर्तुत्व भरारी
धवल मेघही कौतुकी
*
विनयतेने झुकते खाली
फळ लगडता अंगोअंगी
निसर्गाची किमया न्यारी
मित्रत्वाची अद्भुत कहाणी
*
असंख्य संकटे भोवती
हिरवे कोंब जपूनि मनी
स्वप्नं साकारु जीवनाचे
अंकुरा ध्येयाचे पाणी..!
☆
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







कठीण पाषाण भेदून सरसरून बाहेर आलेली ही सृष्टी आनंददायी, प्रेरणादायी , संकटातून किंबहुना विपरित परिस्थितीला सामोरे जाऊन सृजनाचे कवाड उघडणारी निसर्ग किमया आहे.
तुमच्या कवित्वाने ते सर्वांगाने शृंगारले गेले आहे.
शुभेच्छा शुभचिंतन.