सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गुलदाउदीस प्राची… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

(अक्षरगणवृत्त : आनंदकंद – लगावली : गागालगा लगागा गागालगा लगागा) 

आली पहाट वेळी उमलून ताटव्याने 

गुलदाउदीस प्राची सजवी पहा दवाने ||ध्रु ||

*

मेघास धुंद वेळी आली नशा निराळी

दव सांडल्या फुलांना प्रेमे पहा न्यहाळी

वारा खट्याळ जातो छेडून फूल पाने

गुलदाउदीस प्राची सजवी पहा दवाने ||१||

*

रंगात नाहलेली दिसते पहा दिवाणी

कुंदन म्हणू हिला की सोनार राज राणी 

वर्षा न् शरदमाला किती शोभली नव्याने

गुलदाउदीस प्राची सजवी पहा दवाने ||२||

*

गेला वसंत आता पावस ऋतू सुखावे

शेवंतिच्या सुखाने देवालये खुलावे

ती चंद्रमा ती तारा, कुंदन दिसे रुपाने 

गुलदाउदीस प्राची सजवी पहा दवाने ||३||

*

निलिमेस माळताना कुंतल पुन्हा हसावे 

अन् शब्द फूल माझे कवनातुनी दिसावे 

स्वरसाज मी दिल्यावर गाईन कौतुकाने

गुलदाउदीस प्राची सजवी पहा दवाने ||४||

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments