श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मनमोहन! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

दुबोटी गंध भालावरचे

वाढवी मुखाची शान,

धरता अधरी मुरली

शाम विसरे स्वभान!

*

शोभे शिरावर नक्षीदार 

सुवर्ण मुकुट साजिरा,

नाजूक गोंडस मोरपीस 

दावी त्याचा बघा तोरा!

*

कानी डुलती कुंडले 

कंठी नवरत्नांची माला,

नाजूक त्याच्या कटीवर

दिसे शोभून मेखला!

*

सोनेरी घट्ट पितांबर 

माधव आहे नेसला,

स्कंधावरून घेतला 

त्याने साजेसा शेला!

*

पाहून रूप कृष्णाचे 

भान कुणाचेही हरावे,

नयनात साठवून मूर्ती 

दिन रात हरीला भजावे!

दिन रात हरीला भजावे!

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments