सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? भूमीवरती चित्र आगळे !! ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

ऊन कोवळे फिक्कट पिवळे

झाडांमधूनी हळू ओघळे !

ओघळलेल्या कवडशातुनी

भूमीवरती चित्र आगळे!!

*

कॅनव्हास जणू

झाली धरती

कुंचला घेई

निसर्ग हाती !!

*

उमटत जाई

अशा आकृती

गुंग होतसे

मानवी मती !!

*

शाश्वत चित्रण

येथे नसती

क्षणक्षण बदले

इथे आकृती !!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments